बायोगॅस निर्मितीसाठी कच्चा माल
बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. तरी ही, शेणाखेरीज कुक्कुटपालना मधील कचरा, शेतांमधील वाया जाणारा माल, नाइट-सॉइल (रात्री वाहून नेला जाणारा मैला) ह्यांचा ही वापर कच्चा माल म्हणून करता येतो.
बायोगॅस उत्पादनाचे फायदे
हे पर्यावरण मित्रत्वपूर्ण इंधन आहे. बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेड्यापाड्यांमधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ह्या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्वरूप स्लरीदेखील निर्माण होते. तिच्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असल्याने तिचा खत म्हणून ही वापर केला जातो. शेणाच्या गोवर्या आणि लाकडे जाळून चूल पेटवताना निर्माण होणारा धूर आरोग्यास घातक असतो. बायोगॅसपासून असा काही धोका नाही.
बायोगॅसच्या वापराने वातावरण स्वच्छ राहाते कारण ह्या प्रक्रियेमुळे माशा आणि इतर जंतूंना आकर्षित करणारे कचर्याचे उघडे ढीग साचून राहात नाहीत. बायोगॅसच्या वापराने सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे तोडली जाण्यापासून बचाव होतो.

No comments:
Post a Comment