Sunday 13 November 2016


          हिरव्या मिरची चे लोणचे 

साहित्य:
१ ते सव्वा कप हिरव्या मिरचीचे तुकडे (१ सेमी)
३ टेस्पून मिठ किंवा चवीनुसार
१/३ कप मोहोरी पावडर (लाल मोहोरी)
१/२ टेस्पून हिंग
फोडणी: १/४ कप तेल१/२ टिस्पून मोहोरी१/२ टिस्पून हिंग१/२ टिस्पून हळद
१०-१२ मेथी दाणे
कृती:
१) मिरचीला आधी मिठहिंग लावून ठेवावे.
२) तेल तापवावे. त्यात आधी मेथीदाणे तळून घ्यावेत. बाहेर काढून कुटावेत आणि मिरचीमध्ये घालावेत.
३) त्याच तेलात मोहोरीहिंगहळद घालून फोडणी करावी. हि फोडणी थंड होवू द्यावी.
४) फोडणी थंड झाली कि मिरचीमध्ये ओतावीमोहोरी पावडर घालावी. सर्व निट मिक्स करून घ्यावे.
५) स्वच्छ व कोरड्या केलेल्या काचेच्या बरणीत हि मिरची भरून ठेवावी. ८ ते १० दिवस मुरू द्यावी.
सर्व्ह करताना आयत्यावेळी लिंबाचा रस घालावा.


Labels:
Mirchi Lonache, Chili pickle, hot and spicy chili pickle, indian style chili pickle

No comments:

Post a Comment