Sunday 13 November 2016

 नायट्रेट– Nitrate
 
उद्देश  
           पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण (Nitrate) तपासणे.
लागणारे साहित्य  
                                पाणी परीक्षण कीटपाण्याचा नमुना, १ मिली सिरींज, नरसाळे, नायट्रेट तक्ता (Nitratechart).

कृती 
      १.     परीक्षा बाटलीमध्ये १/२ मिली. पाण्याचा नमुना १ मिली सिरींजच्या मदतीने घ्या.
      २.     त्यात रीयेजंट N-1 चे २० थेंब टाका.
      ३.     नरसाळ्याच्या साहाय्याने रीयेजंट N-1 ची १०० मिलीग्रॅम पावडर परीक्षा बाटलीमध्ये घ्या.
      ४.     बाटलीचे झाकण बंद करून बाटली तिरपी करून हळुवारपणे ३-४ वेळा हलवा.
      ५.     त्यानंतर १ मिनिटासाठी स्थिर ठेवा.

१.     यानंतर रंग तुलनाकारात (color comparator) मध्ये बाटली ठेऊन Fl तक्त्यातील कोणत्या रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच करावी.
२.     तक्त्यात गुलाबी रंगाच्या छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान लिहावे.

निरिक्षण:

अनुमान:  
       दिलेल्या पाण्याच्या नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण ____ पीपीएम आहे.

No comments:

Post a Comment