Sunday 13 November 2016

फ्लुराईड – Fluoride


उद्देश –     
        पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण (fluoride) तपासणे.

लागणारे साहित्य –  
               पाणी परीक्षण कीटपाण्याचा नमुना, फ्लुराईड तक्ता (fluoride chart).  

कृती 
     १.       परीक्षा बाटलीमध्ये ३ मिली. पाण्याचा नमुना घ्या.
     २.       त्यात F-10 द्रावणाचे (Reagent F-10) १० थेंब टाका.
     ३.       बाटलीचे झाकण बंद करून बाटली तिरपी करून हळुवारपणे ३-४ वेळा हलवा.
     ४.       त्यानंतर १ मिनिटासाठी स्थिर ठेवा.

१.       यानंतर रंगमापकात (color comparator) परीक्षाबाटली ठेऊन F तक्त्यातील कोणत्या रंगाशी आलेला रंग जुळतो आहे ते पडताळून पहा. रंगाची तुलना पुरेशा सुर्यप्रकाशातच करावी.
२.       तक्त्यात गुलाबी ते पिवळ्या रंगाच्या छटा असतात. त्यातील योग्य त्या छटेशी आलेला रंग जुळवून पहावा व योग्य ते अनुमान लिहावे.
निरिक्षण:
अनुमान: दिलेल्या पाण्याच्या नमुन्यात फ्लोराईडचे प्रमाण ____ पीपीएम आहे.

टीप: 
    जर पाण्याचा रंग, रंगमापकावरील दोन रंगाच्या मध्ये असेल तर दोन्ही रंगांचा/ कप्प्यांचा मध्यबिंदू हे फ्लुराईडच्या प्रमाणाचा मध्यबिंदू समजावा.

No comments:

Post a Comment